परिणाम आढळले नाहीत

    'स्मार्ट' एसटीचा भिकार कारभार! तिकीट मशीन सर्व्हर डाऊन; पण NCMC कार्डधारक महिलेला भररस्त्यात बसमधून हाकलले


    'स्मार्ट' एसटीचा भिकार कारभार! तिकीट मशीन सर्व्हर डाऊन; पण NCMC कार्डधारक महिलेला भररस्त्यात बसमधून हाकलले

    विशेष प्रतिनिधी | बारामती

    एसटी महामंडळाच्या भोंगळ आणि तुघलकी कारभाराचा एक संतापजनक प्रकार बारामतीमध्ये समोर आला आहे. कॅशलेस प्रवासासाठी शासनाने दिलेले NCMC कार्ड आणि त्यात पैसे असूनही, एसटीच्या निकृष्ट ई-तिकीट मशीनने कार्ड स्वीकारले नाही. मशीनचा दोष असतानाही स्वतःवर कारवाई होऊ नये म्हणून एका मुजोर वाहकाने थेट गाडी पोलीस स्टेशनला नेण्याची धमकी देत महिला प्रवाशाला अपमानास्पदरीत्या बसमधून खाली उतरवले.

    नेमके काय घडले?

    • घटनेची वेळ व ठिकाण: १ ऑक्टोबर २०२६, दुपारी २:२७ वाजता, बारामती-नीरा एसटी बस (क्र. ४८१३).
    • कंडक्टरची अरेरावी: महिला प्रवाशाने तिकीट काढण्यासाठी NCMC कार्ड दिले, पण मशीनवर तिकीट निघत नव्हते. यावेळी वाहकाने, "माझे तिकीट निघत नाहीये, चेकिंग आली तर मला सस्पेंड करतील, तुम्ही फुल तिकीट काढा नाहीतर खाली उतरा" अशी सक्ती केली.
    • पोलिसांची धमकी व अपमान: मशीन न चालण्याला एसटी प्रशासन जबाबदार असताना, वाहकाने चक्क गाडी पोलीस स्टेशनला नेण्याची धमकी दिली आणि महिलेला बस स्टँडवर उतरवून दिले.

    एसटीचा नियम काय सांगतो?

    शासनाच्या 'वन नेशन, वन कार्ड' धोरणानुसार NCMC कार्ड राज्यभर चालते. जर तिकीट मशीन (ETIM) बंद असेल किंवा नेटवर्क नसेल, तर तो एसटीचा तांत्रिक दोष आहे. अशा वेळी प्रवाशाला प्रवासापासून रोखणे हा सेवा हमी कायद्याचा भंग आहे.

    मशीनच्या प्रॉब्लेममुळे प्रवाशाला वेठीस धरणारे हे कोणते नियम एसटीने लावले आहेत? एका महिलेचा अपमान करणाऱ्या या संबंधित वाहकावर एसटी प्रशासन कारवाई करणार का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

    टिप्पणी पोस्ट करा

    थोडे नवीन जरा जुने

    نموذج الاتصال