परिणाम आढळले नाहीत

    बारामतीत नक्की चालले तरी काय? चक्क मोफत प्रमाणपत्रासाठी ३०० रुपयांची मागणी!

     



    बारामती प्रतिनिधी 

    बांधकाम कामगार महामंडळाचे प्रमाणपत्र मोफत असताना, एका महिले कडून त्यासाठी चक्क ३०० रुपयांची बेकायदेशीर मागणी केली जात असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

    या महिला महिलेले ने अधिकृत ग्रुपवर "कागदपत्रांसह ३०० रुपये घेऊन जावा " असा उघड मेसेज टाकला आहे, जो या भ्रष्टाचाराचा थेट पुरावा आहे.

    नियमबाह्य ठिकाण: कामगारांचे ट्रेनिंग वाघळवाडीत पार पडले, मात्र वसुलीच्या उद्देशाने त्यांना नियम मोडून जाणीवपूर्वक थोपटेवाडीत येण्यास सांगितल्याचा  स्पष्ट ग्रुपवर  मेसेजआहे.

    संबंधित महिलाही पंचायत समिती अंतर्गत काम करत असून सी.आर.पी पदावर असल्याचे सूत्राच्या  माहिती नुसार समजते

    पदाचा गैरवापर करून गोरगरीब कामगारांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित फौजदारी कारवाई करावी, अशी संतप्त मागणी कामगार वर्गातून होत आहे.

    टिप्पणी पोस्ट करा

    थोडे नवीन जरा जुने

    نموذج الاتصال