सोमेश्वर प्रतिनिधी/सुरेश यादव :
वडगाव पोलीस स्टेशन हद्दीत नियम असूनही शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर टपऱ्यांवर प्रशासनाने अखेर अचानक धाड सत्र राबवले आहे. मात्र, या कारवाईवर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रोज गस्त, तरीही दुर्लक्ष: ज्या भागातून रोज स्वतः पोलीस फिरतात, तिथेच इतके दिवस कोणतीही कारवाई का झाली नाही, हा मोठा सवाल आहे.
शाळा-काॅलेज परिसरात विळखा: सोमेश्वर पॉलिटेक्निक कॉलेजसमोर ३-४ पान टपऱ्यांवर तंबाखूजन्य पदार्थ मिळतात, , तर शेकडो शाळांच्या ५० ते १०० मीटरच्या आत पानटपऱ्या आणि दारूची दुकाने थाटलेली आहेत.
हप्त्याचा खेळ: नियमित हप्ता मिळत होता तोपर्यंत कुणीहीकडे लक्ष दिले नाही, मात्र हप्त्यावरून खटके उडाल्यामुळेच ही 'अचानक धाड' टाकल्याची जोरदार चर्चा आता रंगली आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा टपऱ्यांवर तात्पुरती कारवाई करण्याऐवजी पोलीस प्रशासन ठोस कारवाई करणार का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.आणि अशी हि दाट शक्यता हप्ते मिळताच ह्या टपऱ्या पुन्हा सुरु होतील.
.jpeg)