वाघळवाडी:
कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस यंत्रणेनेच आता नियमांची पायमल्ली सुरू केली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. करंजेपूल पोलीस चौकीच्या आवारात राजकीय नेत्याच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, यात चक्क स्थानिक पोलिसांचा 'आयोजक' म्हणून सहभाग असल्याचे समोर आले आहे.
पोलीस चौकीच्या आवारात राजकीय कार्यक्रम घेण्यास सक्त मनाई असतानाही, ही परवानगी कशी आणि कुणाच्या दबावाखाली दिली गेली, याची चर्चा आता सुरू आहे. राजकीय नेत्यांशी जवळीक साधून पोलीस अधिकारी कर्मचारी स्वार्थिक हितसाठी आणि आपल्या बेकायदेशीर कृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी प्रयत्न करत असल्या बाबत नागरिकांच्या चर्चा होत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकाराची दखल घेऊन कारवाई करतील का ?
