परिणाम आढळले नाहीत

    Baramati News | बारामती तालुक्यात गरिबांच्या हक्कावर दरोडा; बागायतदार आणि शिक्षक बनले 'बोगस कामगार'

     



    बारामती / प्रतिनिधी:

    कधी हातात खोरे-पाटी न धरलेले गब्बर बागायतदार, गलेलठ्ठ पगार घेणारे शिक्षक आणि पेन्शनधारक आता चक्क 'बांधकाम कामगार' बनून सरकारी तिजोरीवर दरोडा टाकत असल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत समोर आला आहे.

    घोटाळ्याचा पर्दाफाश:​अलिशान वाहनांतून बोगस मजूर: ८-१० एकर शेती असणारे श्रीमंत आणि नोकरदार चारचाकी वाहनांतून येऊन कामगार नोंदणी करत आहेत.​दलालांची 'सर्टिफिकेट फॅक्टरी': दलाल आणि बोगस इंजिनिअर ९० दिवस कामाची खोटी प्रमाणपत्रे विकत आहेत. पुरंदर, खंडाळा, फलटण केंद्रांवरून राजकीय एजंट सरसकट नोंदणी करून घेत असल्याची माहिती समोर आलेली आहे.

     अनुदानाची लूट: बोगस दाखल्यांवर मुलांच्या ६० हजार रुपयांपर्यंतच्या शिष्यवृत्त्या लाटल्या जात आहेत. योजनेसाठी रेशनकार्डवरून मुलांची नावे उडवण्यापर्यंत यांची मजल गेली आहे.​खऱ्या श्रमिकांचा छळ: मोफत मिळणाऱ्या भांडी आणि सुरक्षा संचासाठी दलाल १,००० ते २,००० रुपयांचे हप्ते वसूल करत आहेत. पहाटे ४ पासून रांगेत उभ्या राहणाऱ्या खऱ्या मजुरांना मात्र हकलून दिले जात आहे.​शासनाची उघड लूट करणाऱ्या या बोगस कामगारांवर, दलालांवर आणि त्यांना साथ देणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांची पाळेमुळे उपटून टाकावीत, अशी संतप्त लाट बारामतीत उसळली आहे.


    टिप्पणी पोस्ट करा

    थोडे नवीन जरा जुने

    نموذج الاتصال